देश-विदेशमुख्यपान

संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं आहे. यानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित मुलीने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे सरसावलं नाही. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिची गंभीर अवस्था असल्याने तिला इंदूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्यावर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आलं होतं.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओमध्ये ही मुलगी एका गल्लीतून फिरताना दिसत आहे. ती एका छोट्याशा कपड्याने स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे तिने मदत मागितली. मात्र संबंधित व्यक्तीने तिला हाकलून दिलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!