देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी केले सणसणीत भाषण..

सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी सणसणीत भाषण केले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची हिंदू धर्म ही मक्तेदारी नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या संघटनेसह आणि भाजप या पक्षाबरोबर असणारे हिंदू आणि बाकीचे हिंदू असे सरळ सरळ विभागणी त्यांनी लक्षात आणून दिली .
त्यांनी शिवप्रतिमेपासून विवेचनाला सुरुवात केल्यामुळे हिंदुत्वाचे कार्ड वापरणाऱ्या सत्ताधाऱ्यांची पार पंचाईत झाली. शिव ,गुरुनानक ,बुद्ध ,महावीर ,नमाज पढताना दुवा मांगणारे हात यांच्या प्रतिमा दाखवत , सर्व प्रेषितांचे संदर्भ देत त्यांनी शांती आणि अहिंसावादी हिंदू धर्माचा पुनरुच्चार केला.
अग्निवीर योजना ,नीट परीक्षेतील गोंधळ किमान हमीभावाचा मुद्दा , मणिपूरमधील हिंसा , नोटबंदी आणि देशामध्ये सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेले भय , हिंसा , नफरत यांचे वातावरण यावर घणाणती टीका केली.
खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उठून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम झाला नाही. आणीबाणीची आठवण करून देताना आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये उसळलेल्या शिख हत्याकांडाचा संदर्भ देताना शहा आणि मोदी गुजरात दंगल मात्र पार विसरले होते.नितीन गडकरी तर एकदम पुतळ्यासारखे स्तब्ध बसलेले होते.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा पाहण्यालायक होता .”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही झुकून हस्तांदोलन केलं आणि मला सरळ ताठ उभे राहून हस्तांदोलन केलंत ” हा फरक विशद करून लोकसभेचा अध्यक्ष याचे स्थान सर्वात उंच असल्याने त्यांनी या पदाची शान घालवू नये असे सांगितले. “माझे कुटुंब , माझी संस्कृती वडीलधाऱ्यांचा आदर करायला सांगते “अशी सारवासारव बिर्ला यांनी केली .तेव्हा तुमची व्यक्तिगत मत वेगळी आणि येथे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून या पदाचा सन्मान तुम्ही करायला हवा असं राहुल गांधी यांनी सांगितलं
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची धाकटी कन्या अंजली पेपर किंवा इंटरव्यू न देता पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झालेली आहे .त्यामुळे नीट परीक्षेच्या संदर्भात सभागृहात चर्चा घेतली जावी असं राहुल गांधी सांगत असताना ओम बिर्ला यांचे तोंड एखाद्या हडकुळ्या मांजराला पुन्हा पुन्हा पाण्यात बुचकळून काढावे आणि मग ते कसे दिसेल तस्सं दिसत होतं .
हे सर्व कमी म्हणून बिजली गिराने मै तो आई अशा आक्रमक शैलीने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणाऱ्या महुआ मोइत्राने सगळ्या सत्ताधाऱ्यांचा पार पोपट करून टाकला !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!