महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉ.प्रतिभा जाधव यांची दूरदर्शन सह्याद्रीवर मुलाखत

नाशिक- दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षिका , सुप्रसिद्ध वक्ता, साहित्यिक आणि एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. सदर मुलाखत निवेदिका प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली असून प्रक्षेपण मंगळवार दि. ४ जुन २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता आणि पुन:प्रक्षेपण रात्री ११ तसेच ५ जुन रोजी मध्यरात्री १:३०, पहाटे ४:३० व सकाळी ९.००वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे.


प्राथमिक शिक्षिका ते पीएच.डी. मार्गदर्शक असा डॉ.प्रतिभा जाधव यांचा आजवरचा प्रवास आहे. शिक्षणक्षेत्रात उपक्रमशील प्राध्यापिका म्हणून कार्य करत असतानाच डॉ.जाधव महिला सबलीकरण व युवा जनजागृतीसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. आजवर विविध साहित्य प्रकारांतील त्यांच्या एकूण १३ साहित्यकृती प्रकाशित आहेत. ‘मी अरुणा शानबाग बोलतेय!’, ‘मी जिजाऊ…!’, ‘मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय!’ हे प्रबोधनपर एकपात्री प्रयोग लोकप्रिय आहेत व परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे नाट्यप्रयोग सादर करण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीतही त्या कार्यरत आहेत. नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांच्या शैक्षणिक साहित्यिक,सामाजिक, सांस्कृतिक योगदानासाठी त्यांना आज विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!