निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

उज्वल निकम यांचा राजकीय प्रवास सुरू; पूनम महाजन यांचा पत्ता कट करत मुंबई उत्तर मधून भाजपा ने दिले तिकीट.

मुंबई : लोकसभा 2024 च्या रिंगणात रोज नवनवीन घटना घडत आहेत. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारी बाब अखेर सत्यात उतरली आहे. अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून उज्ज्वल निकम आपल्या राजकारणाचा प्रवास करताना दिसणार आहेत. 

मुंबई हल्ल्यातील सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिलाची भूमिका पार पाडली. दहशतवादी कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. यात निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती खैरलांजी हत्याकांड सारखे संवेदशील प्रकरण त्यांनी हाताळले. त्यामुळे सर्वांना परिचित असणारा आणि गुन्हेगारांचा कर्दन काळ असणारा चेहरा भाजपा ने निवडला आहे.

मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. यानंतर भाजपमधून अनेकजण या मतदार संघासाठी इच्छूक होते. पण राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र भाजपकडून उज्जल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!