महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

नायब सुभेदार दिगंबर बनसोडे यांनी दिली बुद्ध विहाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट

सर्वत्र होतय कौतुक व अभिनंदन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व विश्ववंदनीय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित सेवानिवृत्त नायब सुभेदार महार बटालियन भारत सरकार आयुः – दिगंबर अंबादास बनसोडे व आयू :- आशा डिगंबर बनसोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पाच फुटी काचेचे फ्रेम केलेली प्रतिमा नळदुर्ग येथील नालंदा बुद्ध विहारात व डॉ आंबेडकर नगर मधील सभागृहाला भेट दिली असून त्या नवीन प्रतिमाच पूजन करण्यात आले यावेळी बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले .
यावेळी अंबादास चंद्रप्पा बनसोडे राधाबाई अंबादास बनसोडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुजन करण्यात आले . यावेळी नायब सुभेदार दिगंबर अंबादास बनसोडे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे यांनी निळ्या ध्वजाला मानवंदना दिली नायब सुभेदार डिंगबर बनसोडे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळाच्या वतीने निळी टोपी पंचशिल शाल देऊन सचिन कांबळे यांनी सन्मान केला या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी आर पी आय (A) जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुष्यंत बनसोडे , प्रमिला बाबासाहेब बनसोडे , हरि गायकवाड , जयंती प्रमुख सूर्यकांत सुरवसे , रमेश शिंदे , रिपाई चे मराठवाडा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे , ओमप्रकाश बनसोडे , शारदाताई हरि गायकवाड , बेबीनंदा रमेश शिंदे , किशोर कोंडीबा बनसोडे , जीवन बनसोडे , सचिन बनसोडे , सचिन कांबळे , प्रविण गायकवाड , जयश्री बनसोडे , रोहिणी बनसोडे करिश्म बनसोडे तुषार गायकवाड , गौरी थोरात
अमर बनसोडे , हमराज कांबळे , मिरा थोरात , सुजाता कांबळे , नानीमाँ कांबळे , निलेश बनसोडे सह अनेक बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या अनेक महिला व पुरुषानी मेजर नायब सुभेदार डिंगबर बनसोडे व बनसोडे परिवाराचे कौतुक व अभिनंदन करित आहेत .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!