वादग्रस्त कारकीर्द असलेला भ्रष्ट पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे अखेर ACB च्या जाळ्यात; त्रस्त नागरिकांनी केला एकच जल्लोष.

धुळे : कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी असलेल्या वर्दीतील पोलीस अधिकारी जेंव्हा नोकरीला पैसा कमावण्याचा धंदा समजतात तेंव्हा ते फक्त पैसा कमवू शकतात, आदर आणि इज्जत मात्र गमावून बसतात. असाच प्रकार नवापूर मध्ये घडला.
गुजरात राज्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्विकारताना नवापूरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने बुधवार (दि.२४) रोजी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या कामकाजावर नाराज असलेल्या नवापूर मधीक नागरिकांनी नवापूर पोलिस स्टेशनच्या आवारात रात्रीच्या सुमारास एकत्र येत अधिकारी वारे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रचंड भ्रष्टाचार, सामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे, हुकुमशाही पद्धतीने दमदाटी दडपशाही अशा पद्धतीची वादग्रस्त कारकीर्द असलेल्या वारे याला ताब्यात घेताच नागरिकांनी एकत्र येत आनंद व्यक्त केली.
ज्ञानेश्वर वारेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक वाहनातून नंदुरबारकडे रवाना होत असताना नागरिकांनी जल्लोष केला आणि दमदाटी व अडवणूक करणाऱ्या पोलीस वाहनावर दगडफेक केली.
पोलिस निरीक्षक वारेच्या हुकूमशाहीतून नवापूर तालुका मुक्त झाल्याच्या घोषणा देत नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत