मंगळसूत्राच महत्त्व तुम्हाला काय कळणार ? – उध्दव ठाकरेंचा मोदींना खोचक सवाल.

मुंबई : राजस्थान मध्ये प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हिंदू स्त्रियांना मंगळसूत्र आणि संपत्ती तील वाटा याबद्दल मनात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. यावर “मोदीजी मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे जास्त मुलं असणा-यांना दिली जातील असा आरोप मोदींनी केला होता. त्यावरच ठाकरेंनी पलटवार केला आहे. तसंच महाराष्ट्रातली जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही ठाकरेंनी मोदींना दिला.
मंगळसूत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार केलीय… निवडणूक आयोगानं अजून तरी त्याबाबत काहीच पाऊल उचललेलं नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत