धाराशिव सुपुत्र लेखक साहित्यिक आयु. विजय गायकवाड सर “राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात 17 दिवस भोगला होता कारावास.
टीम दैनिक जागृत भारत च्या वतीने हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक मंगल कामना.
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड, संत रोहिदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते.
दैनिक जागृत भारत समूहाचे सक्रिय सदस्य, विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत, सामाजिक व धम्म क्षेत्रात सदैव कार्यतत्पर असणारे, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात कारावास भोगलेले, मंडल आयोगाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविलेले, अंधश्रद्धा निर्मूलन लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविलेले, विविध सामाजिक लढे, प्रबोधनाच्या चळवळी, सत्याग्रह, मोर्चे, आंदोलनात सहभागी असलेले प्रतिभावान लेखक कवी साहित्यिक आयु. विजय गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून शासनाने सन 2020-21 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार धाराशिव येथील विजय साहेबराव गायकवाड यांना जाहिर केला. पुरस्कारांचे वितरण मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृह, नरिमन पॉईट, मुंबई येथे मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे साहेब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण महाराष्ट्र राज्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व इतर मान्यवरांच्या उपस्थित दि. 12/03/2024 रोजी करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, 15 हजार रुपयाचा धनादेश व पुष्पहार असे आहे, श्री विजय गायकवाड यांना यापूर्वी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विविध संस्थांनी पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर, “मला मिळालेला हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मी मला बुद्धत्वाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालायला शिकवणाऱ्या आई वडिलांना आर्पण करतो” अशी कृतज्ञतापूर्वक भावनिक प्रतिक्रिया दिली.
विजय गायकवाड यांचे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध पक्ष संघटना, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र परिवारातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत