वार्षिक स्नेहसंमेलनातून घडतात भावी कलाकार -गौतम कांबळे

जि . प .शाळा खोरवडी येथे आयोजित केलेल्या जल्लोष 2024 वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद….
वार्षिक स्नेहसंमेलनातून घडतात भावी कलाकार -गौतम कांबळे यांची माहिती
जि. प. प्राथ. शाळा खोरवडी या ठिकाणी जल्लोष 2024 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. वर्षा धावडे ,उपाध्यक्ष मोनाली शिंदे व समितीमधिल सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कांबळे व उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.या स्नेहसंमेलन सोहळ्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेने केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केली. स्नेहसंमेलनादरम्यान होणाऱ्या गाणी, नृत्य ,अभिनयास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले. अभ्यास, परीक्षा, खेळ ,व्यायाम याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रत्यक्ष मिळणारे व्यासपीठ म्हणजे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होय.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कला सादर करण्याची येथे संधी उपलब्ध करून दिली जाते. आत्मविश्वास, सभाधिटपणा या संमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्याचा शाळेतील शिक्षक प्रयत्न करतात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्यामध्ये स्नेहबंध तयार होतो. एक अविस्मरणीय बालपण मुलांना या माध्यमातून जगता येते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचे प्रदर्शन व निर्मळ आनंद देणारा सोहळाच असतो याची प्रचिती या वार्षिक स्नेहसंमेलनातून आली .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गौतम कांबळे यांनी केले . हौशीराम गायकवाड ,अभिजीत कोंडेजकर , सौ. नीता भद्रे मॅडम, श्रीम. शितल कदम मॅडम, सौ. साक्षी कोंडेजकर मॅडम व पालक वर्ग सर्वांनी परिश्रम घेऊन स्नेहसंमेलन उत्कृष्टपणे यशस्वी केले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गोरख सोनवणे यांनी शाळेची आकर्षक रोषणाईने सजावट केली होती. त्यांनी स्टेज, साऊंड सिस्टिम देऊन बहुमोल योगदान दिले. अभिजीत कोंडजकर , श्रीम.शितल कदम , सौ.साक्षी कोंडेजकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्रीम.निता भद्रे यांनी उत्कृष्ट नियोजनासह नृत्यदिग्दर्शकाची भूमिका पार पाडली .हौशीराम गायकवाड यांनी तंत्रिक बाबींचे नियोजन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानले. – खोरवडी शाळेतील
जल्लोष स्नेहसंमेलनाचा खऱ्या अर्थाने जल्लोषात साजरा झाला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत