महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराज

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १४

गूरू रविदास जयंतीनिमित्त पुष्प …14

संत रविदास की संत रोहिदास…?

हिंदी साहित्यात अनेक धार्मिक साहित्यात वाणी,काव्ये,पदे,दोहे,साखी या मध्ये संत रविदासांच्या अनेक नावाचे संदर्भ वाचायला मिळतात..!

संत,…गुरू…,भगवन…भगत,..चमारा खलास…, रविदास…रैदास….,रि दास….. ,रोहिदास,.. असे ,उल्लेख आढळतात. अजून ही अनेक कित्येक नावे लोकांत लोककथेत , ऐकिवात आहेत परंतू ,त्यांचा संदर्भ मला मिळाला नाही .रोहिदास वा रविदासाचे मराठीत काव्य रचना नाहीत. .इतर संत, महोदयांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहे..! “मनचंगा संत रोहिदास “ही कादंबरी लिहताना मी ” रोहिदास” असे नाव दिलेले आहे कारण संत रविदासांना अथवा रैदासांना खास मराठी वळणाचे रोहिदास नाव तत्कालीन मराठी बहुजनांनी दिलेले आहे व ते नाव मला भावले म्हणून स्वीकारले. कादंबरीत बाल रविदास ते संत रोहिदास हा प्रवास मी लिहण्याचा प्रयत्न केलेला आहे… !( सदर पुस्तक बार्टी स्विकृत आहे.ही संस्था केवळ फुले ,शाहू आंबेडकरवादी पुस्तके पुरस्कृत करते)…

वर्णाश्रम अभिमान तजि पदरज बन्दहि जासुकी!
संदेह ग्रंथी खंडन निपून , बानी बिमल रैदास की !!
( भक्तमाल इ स 1623 रचिता संत नाभाजी..)

(वर्णाश्रम धर्माचा अभिमान सोडून ज्यांच्या पदधुळीस सुद्धा वंदन करावे अश्या रैदासांची विमल वाणी मनातील संदेह(संशय) ग्रंथीचे खंडन करण्यात निपुण आहे ) ..

मेरो मन लागो हरि सूॅ ,अब न रहूंगी अटकी!
गुरू मिलिया रैदासजी , दीन्ही ग्यानकी गुटकी !! …….संत मिराबाई..

कहे रैदास कृष्ण करुणामय जै जै जगत अधारा! _ हम सरनागति राम राईको कहै रैदास चमारा!… ..स्वत: संत रविदास.

मीरा म्हाने संत है मै संत री दास !
चेतन सत्ता सैनिये दिसत गुरू रविदास!!..संत मीरा .

झाँझ पखावज वेणु,बजावत नौ झंकार!
काशी नगर का चौकमां गुरू मिला
रोहिदास !!..
संत मिराबाई.
(मीराॅ स्मृती ग्रंथ पृ 56)

मीरा सतगुरू देवकी करै वंदना आस!
जिन चेतन आतम कह्या ,धन भगवन रैदास !!…मिराबाई.

ज्यांहा देखो वाहाॅ चामही चाम!
चामके मंदीर बोलत राम!
चामकी गऊ चामका बचडा
चामही धुने चामही चामही ठाडा!!
चामका हाथी चाम का राजा
चाळके ऊॅटपर चामका बाजा
कहत रोहिदास सुनो कबीर भाई
चाम बिना देह किनकी बनाई.. स्वतः संत रविदास ( कबीराचा गाथा प्रकाशक वि.ना गोडबोले पंढरपुर पृ 124)

जेगद्गुरू सेंकरसे कहिये !
झुटी बाका बोले!!
धने कबीरा धन्य रहिदासा !
गावे शेना न्हाउ!!
(कबीर रोहिदास संवाद.प्रसाद मार्च 1968).. संत सेना.

ऐका श्रोते हो सावकाश!
परम वैष्णव रोहिदास !!
मने दुराशा सांडोन !
भावे करीतसे हरिकीर्तन!
नित्यनियम स्नान करून!
विष्णु पुजन करीतसे!!
(महिपती..)
भक्तिविजय अध्याय 25 1..3)

जडजीव उदधराया आले भूवरी धरूनि अवतार!
कंठमणी श्रीहरीचे हीन कुळी रोहिदास चांभार!!
……श्री दासगणू महाराज.

कथी हिंदुधर्म, धर्म विठ्ठलाचा आमूच्या वाडवडिलांचा
तुम्ही अम्ही हिंदू ,हिंदू जातीचे सर्वही भक्त विठ्ठलाचे!!
रक्षु हिंदुधर्म, धर्म विठ्ठलाचा आमुच्या वाडवडिलांचा !!
असे रोहिदास , रोहिदास संत, वंदे त्या भेटे भगवंत.!!….
वि दा सावरकर (फक्त माहिती व संदर्भा साठी …)
माझा कुठलाही दावा नाही आग्रह नाही.इच्छुकांनी मनचंगा संत रोहिदास वाचावा त्यानंतर उत्तम संवाद करता येईल ..!
कसं आहे मित्रानो,
चांभार या शब्दाला मराठी व्युत्पत्ती कोशात पृष्ठ क्रमांक.300 वर अनेक नाव आहेत
संस्कृत… चर्मकार
पाली…चम्मकारो
प्राकृत..चम्मारअ
बंगाली …चांमार
ओरिया…. चमारा
बिहारी नेपाळी ….. चमार
पंजाब…..चमार व चमिआर यावरून चाम्हारू,चामाडी, अकामसा,
सिंधी…. चमारू
सिंहली …सोम्मारू अशी नावे दिली आहेत.
संत रविदासांनी अफगाणिस्तानपर्यंत दोनदा पायी भारत भ्रमण केल्याचेही वाचनात आलेले आहे.त्यामुळे ते भाषा, प्रांत ,जात,धर्माच्या देशाच्या पलिकडे जाऊन सर्व सामान्यांच्या काळजात जाऊन बसले होते.प्रत्येक भाषिकांनी रविदासांना आपल्या खास वळणात त्यांना भक्तिभावाने नावे दिलेली आहेत. भाव लक्षात घ्यावा नाव कोणतेही असावे …! गौतम बुद्धाना अनेक नावाने ओळखले जाते. बाबासाहेबांना अनेक नावाने ओळखले जाते.जेवढी लोकप्रियता जास्त तेवढी अनेक नावे प्रचलित होतात. वारकरी भाविक संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात, तसे संत रोहिदास हे भाविकांचे आवडीचेनाव आहे…!

लेखक.ॲड.आनंद गवळी.
BA (eco) ,LLB, MLL&LW, LLM.
राष्ट्रीय उपाध्यक्ष
राष्ट्रीय चर्मकार महासंघ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!