
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी सांगितले. लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झाले. प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीने शिफारस केल्यावर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील, अशी तरतूद या विधेयकात आहे. लोकसभेत आज वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयक मांडण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंग ठाकूर आज राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत