मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली तातडीची सर्वपक्षीय बैठक.

मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. मनोज जरांगे आता आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत आरक्षणावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी 10.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडे राज्याच लक्ष लागलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत