आता “सेट” परिक्षा होणार एका वर्षांत दोन वेळा

विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या वतिने ‘सेट’ ही वर्षातून दोनदा घेण्याचा विचार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी यंदाची सेट परीक्षा जरी ऑफलाइन असली तरी त्यानंतरची परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार आहे. विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाइन सेटचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात घोषित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो
सोमवारपासून (ता.२०) सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परिणामी सेट परीक्षा येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत