महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

जरांगेचा अल्टिमेटम, आज ओबीसी सेलच्या बैठका.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ओबीसींच्या 40 संघटना उपस्थित राहणार आहेत. नागपूरात रवी भवन येथे आज सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली आहे. ओबीसी म्हणून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ओबीसी समाजात खळबळ उडाली आहे. ओबीसींमध्ये मराठा समाज आल्यास आरक्षणाचा टक्का कमी होणार असल्याची भीती ओबीसींना आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांची मागणी फेटाळून लावली आहे. काही नेत्यांनी तर आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा पाचपट सभा घेऊन मराठ्यांच्या ओबीसीतील समावेशाला विरोध करू असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपचे ओबीसी सेलही कामाला लागले आहेत. या दोन्ही सेलची आज बैठक होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!