पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने वाद, कार्यकर्त्यांकडून लोखंडी रॉडने मारहाण

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. देशभरातील भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात भीषण चित्र पाहायला मिळालं आहे. या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपाच्या मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवरून भाजपाच्याच दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा विधानसभा संपर्क प्रमुखांना पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. यासह इतर काही ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत