
देशभरातल्या विविध प्रांतातून निवडण्यात आलेल्या निवडक १९ बालकांना हा पुरस्कार देण्यात येणार. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४ चे वितरण येत्या २२ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार. यात २ प्रस्तावित जिल्ह्यांसह १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ५ ते १८ वर्षं वयोगटातल्या बालकांची निवड केली आहे. या पुरस्कारासाठी कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांची निवड करण्यात आली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांशी २३ जानेवारीला संवाद साधतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत