शोषित ,वंचित, दुर्लक्षित, दुर्बल, अतिमागास समाज घटकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे

इ झेड खोब्रागडे,
शोषित ,वंचित, दुर्लक्षित, दुर्बल, अतिमागास समाज घटकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी ,संविधान फौंडेशन che वतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ,मुख्यसचिव यांना निवेदन पाठविली आहेत. रेशन कार्ड्स, आधार कार्ड्स, जातीचे दाखले, जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे, वस्तीमध्ये सुविधा ह्या बेसिक मागण्या आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उपजीविका, सुरक्षा हे ही मुख्य प्रश्न आहेत.
नागपूर जिल्ह्यातील रहाटे टोली तील मांग गारुडी, मानेवाडा येथील गोंड वस्ती, कळमना येथील मुस्लिम मदारी ,उत्तर नागपूर मधील वस्त्या अशा अनेक वस्त्यांमध्ये समस्या आहेत. महाराष्ट्रभर वंचितांच्या वस्त्यांमध्ये समस्या आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत.
नागपूर चे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना 4 सप्टेंबर 2023 पासून या विषयावर बैठक घ्यावी अशी मागणी करीत आहोत. आता पुन्हा 4 सप्टेंबर 2024 ला मेल पाठवून मागणी केली आहे.
मांग गारुडी अनुसूचित जातीमध्ये मोडतात. अतिमागास ahet, अनेक कुटुंबाकडे जातीचे असूनही जातीचे प्रमाणपत्र नाही. आमचे विनंतीवरून जिल्हाधिकारी नागपूर यांनी दोन वर्षपूर्वी सचिव सामाजिक न्याय विभाग यांचेकडे प्रस्ताव पाठविला. अजूनही निर्णय नाही. तेव्हाचे सचिव सुमंत भांगे यांना वारंवार आग्रह केला परंतु निर्णय झाला नाही. DG बार्टी यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडील बैठकीत विषय मांडला . अजून काही झाले नाही.त्यामुळे जातीचे दाखले मिळत नाहीत. योजनांच्या लाभापासून हा Sc मधील अतिमागास वर्ग वंचित आहे. हीच स्थिती गोंड , पारधी, भटके विमुक्त ,कोलाम, मुस्लिम मदारी etc बाबत आहे.
अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण चे बोलायचे परंतु, अतिमागास साठी काही करायचे नाही, कसा विकास होणार? नागपूर चे पालकमंत्री यांचे मतदारसंघात रहाटे टोली मांग गारुडी समाज राहतो. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बैठक ची मागणी केली आहे. प्रश्न सुटेपर्यंत बोलत राहावे लागेल.
इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर
दि 5 सप्टेंबर 2024
मो-9923756900.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत