
एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्व करंडक २०२३ स्पर्धांना आजपासून प्रारंभ होत असून भारताचा पहिला सामना आज क्वालालंपूर इथं मलेशियाबरोबर होणार आहे. यापूर्वी दोन वेळा भारत हॉकीमधील विश्वविजेता ठरला आहे. त्यामुळे आता या स्पर्धांची सुरुवातही विजयानेच करण्याच्या जिद्दीनं भारतीय संघ मैदानात उतरेल. पूल सी मधील गटात भारताचा पहिला सामना कोरियाबरोबर होणार आहे. या गटात कोरिया आणि भारतासह स्पेन आणि कॅनडाचा समावेश आहे. यावर्षी सुरुवातीला भारताचा सामना केनियाबरोबर झाला होता, त्यामध्ये भारतानं केनियावर ९-१ असा विजय मिळवला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत