महा विकास आघाडीचं ठरलं; संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर

मबई : महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या बहुचर्चित वादाला आता पूर्णविराम लागायचं असं म्हणायला हरकत नाही कारण आज महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीचा 21 : 10 : 17 चा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गट – 21, काँग्रेस – 17 तर राष्ट्रवादी शरद पवार गट – 10 जागा लढणार आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेस शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह सर्वच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस – नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
शिवसेना – जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई
राष्ट्रवादी – बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड
या पत्रकार परिषदेआधी काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची स्वतंत्र बैठक झाली होती. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह माकप, भाकप, आप, समाजवादी पक्ष सहभागी असल्याचं सांगण्यात आलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत