खान्देशमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

नाशिक मध्ये एकाच दिवशी २ बिबटे दिसल्याने स्थानिकांमध्ये भीती.

नाशिक शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली.अखेर वन विभागाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सिडकोतील रायगड चौकात बिबट्याला जेरबंद केले. तर, गोविंद नगरमधील अशोका प्राईड इमारतीत एका सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला जागरुक डॉक्टराने खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या खोलीतील बिबट्याला बेशुध्द करून ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सिडकोत बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे जेरबंद करण्याच्या कार्यात अडथळे आले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

यापूर्वी अनेकदा शहरातील वेगवेगळ्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात दोन बिबट्यांचे आगमन झाल्यामुळे वन विभागाची दमछाक झाली. वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. बिबट्याचा वावर सीसी टीव्हीमध्ये कैद झाला. सावतानगरातील विठ्ठल मंदिर, जीएसटी कार्यालय, लष्करी कार्यालय, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला. हा सर्व अतिशय दाटीवाटीचा रहिवासी भाग आहे. वन विभागाच्या पथकाने इंजेक्शन डागून बिबट्याला बेशुध्द केले. नंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. याच दरम्यान, गोविंदनगर भागात दुसरा बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्याने वन विभागाचे पथक लगेच तिकडे रवाना झाल्याचे वन अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!